nath loader

श्रीदेवनाथ परंपरा भजन संपदा

श्रीदेवनाथ परंपरा भजन संपदा

श्रीदेवनाथ परंपरा भजन संपदा हा श्रीदेवनाथ पीठाच्या अलौकिक परंपरेतील पीठाधीशांच्या रचनांनी समृद्ध असा ध्वनिमुद्रित भजनसंग्रह आहे.

या दिव्य परंपरेतील सतरावे पीठाधीश प.पू. सद्गुरु श्रीमनोहरनाथ महाराज आणि विद्यमान पीठाधीश आचार्य स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज (प.पू. श्रीगुरुजी) यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच वै. आदरणीय दत्तात्रेय केशव लोमटे यांच्या प्रेरणेतून, नाथभक्त श्री माधव दत्तात्रेय लोमटे यांनी ही भक्तिपूर्ण सेवा श्रीनाथ चरणी अर्पण केली आहे.

या संपदेत परब्रह्म महारुद्र श्रीदेवनाथ महाराजांपासून ते आजपर्यंतच्या सर्व पीठाधीशांच्या उपलब्ध रचनांचा संग्रह आहे. यामध्ये हिंदी व मराठी भाषेतील ११०० हून अधिक पदे, गण, अभंग, स्तोत्रे, प्रार्थना व आरत्या यांचा समावेश असून, हा खजिना श्रीनाथ भक्तांना एक अनुपम आध्यात्मिक अनुभव प्रदान करणारा आहे.

या भजन संपदेचा रसास्वाद घेण्यासाठी कृपया खालील गूगल ड्राईव्ह लिंकवर क्लिक करा व श्रवणाचा लाभ घ्या.