nath loader

श्रीदेवनाथ महास्थानम्

श्रीदेवनाथ महास्थानम्

  • श्रीदेवनाथ महास्थानम्, श्रीनाथपीठ, श्रीदेवनाथ मठ अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र हे जगातील अत्यंत सिद्ध तीर्थस्थानांपैकी एक स्थान आहे.
  • ह्या सिद्धपीठाची प्रासादीक निर्मिती श्रीनारायणाच्या  कृपेनी भगवान दत्तात्रेयांनी केली. या पीठ परंपरेची उपास्य देवता भगवान श्रीनारायण असून, इष्ट देवता भगवान श्रीहनुमान आहे, संरक्षक देवता श्रीभैरव  आहे तर आचार्य देवता भगवान श्रीदत्तात्रेय आहेत. शक्ती श्री अनघालक्ष्मी आहे. अधिष्ठात्री देवता पिताश्री ब्रम्हदेव आहेत तर ज्ञानाचार्य श्री अत्री ऋषी आहेत. या पीठपरंपरेची संवाहक देवता परंपरेने या पीठासनावर विराजमान होणारे  पट्टाभिषिक्त आचार्य श्रीनाथ पिठाधीश्वर श्री जगद्‌गुरु अवतारी महापुरुष (गुरु) असतात. त्यांना  “नाथ” असे या.. म्हंटले जाते.
  • इ.स. २००० साली जगद्‌गुरु भगवान आचार्य सद्‌गुरु श्रीमनोहरनाथ महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर सध्या जगद्‌गुरु आचार्य सद्गुरु श्रीजितेन्द्रनाथ स्वामी महाराज हे श्रीनाथपीठाधीश्रर आहेत.

तीर्थक्षेत्राचे माहात्म्य

  • श्रीदेवनाथ मठ या स्थानी भगवान दत्तात्रेय, श्रीअनघालक्ष्मी, हनुमंत, भैरव, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गहनीनाथ, तथा श्रीजनार्दनस्वामी-एकनाथांपासून श्रीगोपाळनाथ- गोविंदनाथ-श्रीदेवनाथांपासून सकल श्रीनाथब्रम्ह येथे नित्यसिद्ध निवासी आहेत.
  • येथे श्रीनाथ सिद्धकुंड-सिद्धपिंपळ, श्रीभैरव जगु-गणू स्थान, श्रीदत्तात्रेय दंड स्थानम्, श्रीपीठस्थानम् (गादी), श्रीसिद्धीविनायक, श्रीदत्त निर्गुण पादुका (गाणगापूर), श्रीदत्त औदुंबर स्थान आदी अनेक शक्तीस्थल आहेत.
  • श्रीदेवनाथ मठ हे परम तीर्थस्थान असून येथे केलेली साधना, पारायण, जप व तपस्या ही शीघ्रसिद्धीदायक आहे. कारण शरनीरा नदी मठाकडे येताना उत्तर-दक्षिण येवुन धडकते व मठासमोरून ती पश्चिम-पूर्व अशी वाहते व मठ संपताच पुनश्च दक्षिणेकडे निघून जाते. म्हणून श्रीदेवनाथ मठ दक्षिण-पूर्व वाहिनी शरनीरा तट सिद्धीक्षेत्र असेही ओळखल्या जातो. यामुळेच याठिकाणी भारतवर्षातून अनंत साधू- संत व साधक दर्शनाला येत असतात.
  • याठिकाणी निवास, स्नान, प्रसाद व तीर्थ प्राप्ती तसेच येथील सिद्धमंत्र उपासना, या तिर्थक्षेत्र सुर्जी स्थानाची ग्रामपरिक्रमा, येथील तपस्या पारायण आदि वर्षातून एकदा तरी घडावे. हे ज्याला घडते तो परम भाग्यवान व कृपावंत आहे हे खर.

मठा बाबत माहिती

  • श्री देवनाथ मठ हे पैठणच्या एकनाथ महाराजांची एका जनार्दनीं दत्त प्रासादिक पीठ परंपरा असलेले विदर्भातील प्रसिद्ध तीर्थस्थान होय.
  • परब्रह्म महारुद्र सदगुरु श्रीदेवनाथ महाराज यांच्यापासून विद्यमान पीठाधीश आचार्य सदगुरु श्रीजितेंद्रनाथ महाराज यांच्यापर्यंत देव, देश आणि धर्मकार्यार्थ समाजाभिमुख असलेले नाथ परंपरेतील ऊर्जाकेंद्र होय.
  • श्रीदेवनाथ मठ हे दत्त प्रासादिक श्रीनाथ पीठ असून या पीठाची उपास्य देवता श्रीहनुमंत आहे आणि प्रधानदेवता श्रीमाधव -मंजिरी (राधाकृष्ण) आहे.
  • या पीठावरील पीठापुरुष हे सदैव देव, देश आणि धर्म कार्याकरिता समर्पित जीवन व्यतीत करतात.
  • सामाजिक समरसता आणि परिवार प्रबोधन या दोन्ही सूत्रांना सोबत घेऊन चालणे ही श्रीनाथ पीठाची परंपरेची विशेषता होय.
  • कीर्तन, प्रबोधन, संवाद , प्रवचन , शिबीर , उत्सव , समाज संघटन आदी विविध आयामांच्या मार्फत या परंपरेशी जोडले गेलेले हजारो साधक परिवार भारत आणि विदेशातही कार्यप्रवण आहेत.

मठाची परंपरा

  • श्रीदेवनाथ मठ ही नाथ संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण पीठपरंपरा असून, ती जनार्दनी दत्त प्रासादिक पीठ परंपरेशी जोडलेली आहे. परब्रह्म महारुद्र सद्गुरु श्रीदेवनाथ महाराज यांच्यापासून विद्यमान पीठाधीश आचार्य सद्गुरु श्रीजितेंद्रनाथ महाराज यांच्यापर्यंत, ही परंपरा देव, देश आणि धर्मकार्याला समर्पित राहिली आहे.
  • श्रीनाथ पीठाची उपास्य देवता श्रीहनुमंत, तर प्रधानदेवता श्रीमाधव-मंजिरी (राधाकृष्ण) आहेत. येथे संतपरंपरेतील अनुशासन आणि गुरू-शिष्य परंपरेचा दृढ आधार असून, अध्यात्म, साधना आणि सेवा हीच या मठाची प्रमुख तत्त्वे आहेत.
  • या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक समरसता आणि परिवार प्रबोधन. कीर्तन, प्रवचन, शिबिरे, उत्सव आणि समाज संघटनाच्या माध्यमातून या परंपरेशी जोडलेले साधक भारतासह विदेशातही कार्यरत आहेत.
  • श्रीनाथ पीठ हे संतपरंपरेतील एक ऊर्जाकेंद्र असून, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक उन्नती याला सर्वोच्च स्थान देते.