हे भारतवर्षातील विविध प्रांतात नित्य उपासनेचे आध्यात्मिक सांस्कृतिक समूह आहेत.
या अंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक कल्याणाकरिता पुरुषांचे सामूहिक संगठन अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहे.
विविध शिबिरे, युवा प्रबोधन बैठकी, भजन, सत्संग, नियमित प्रार्थना आणि समाज कल्याणाकरिता आवश्यक प्रासंगिक सार्वजनिक कार्यक्रमांचे संचालन श्रीनाथ सखा साधक वृंदाद्वारे केले जाते.
समाजातील विविध वर्गांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये ओज, तेज आणि बल यांचे उपासनेच्या माध्यमातून पुनर्जागर हे या संगठनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.
विविध व्रत, पर्व आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करतानाच त्याचे बोधात्मक मर्म जाणून घेणे आणि परिवार संस्था बळकट करण्याचे महत्वाचे कार्य या उपक्रमाद्वारे पार पाडले जाते.