अनेक वर्षांपासून सुर्जी येथील दसरा मैदानावर श्रीनाथ पिठाद्धेश्वरांच्या(विद्यमान प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज) उपस्थित परंपरागत दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो.
यामध्ये संपूर्ण ग्राम सहभाग आणि विजयादशमीच्या पर्वावर शक्तिपूजन केले जाते.
या दिवशी संध्याकाळी श्रीदेवनाथ मठातून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते.
परंपरे प्रमाणे पालखी व श्रीरामचंद्र तसेच हनुमान यांचे विग्रह असणारा रथ घेऊन प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज या मिरवणुकीचे नेतृत्व दसरा मैदाना पर्यंत करतात.
संपूर्ण रस्त्याने भाविक या मिरवणुकीचे स्वागत तथा पालखीचे दर्शन घेतात. तसेच यामध्ये लेझीम, विविध झाँकी, वाद्य पथके, शोभायात्रा तसेच अनेक शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली जातात.
दसरा मैदानावर भगवान श्रीरामचंद्र - श्रीहनुमान व श्रीदेवनाथ महारांच्या पादुकांचे पूजन होते आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. तसेच मैदानावर मल्लखांब, तलवारबाजी,दांडपट्टा या साहसी खेळांचे प्रदर्शन होते.
प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या उद्बोधनानन्तर ही मिरवणूक श्रीदेवनाथ मठात परत जाण्यासाठी निघते. दरम्यान मार्गात येणाऱ्या सर्व सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळातील दुर्गादेवींचे पूजन प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज करतात.