देशातील दुर्गम जंगले आणि पर्वतांमध्ये राहणारा आदिवासी समाज हा आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा खरा संरक्षक आणि संवाहक आहे.
आदिवासी समाजापर्यंत विकास आणि कल्याणाची किरणे पसरवून ‘परस्पर एकता आणि सौहार्द’ ही भावना दृढ करण्यासाठी वनवासी छात्रावास अंजनगाव सुर्जी येथे कार्यरत आहे.
श्रीनाथ वनवासी छात्रावास येथे मेलघाट येथील अति दुर्गम भागात असलेल्या विद्यार्थी वर्गाची शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने प. पू.श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने वनवासी छात्रावास सुरू करण्यात आले.
आजवर ५०० हुन अधिक बालवर्गाने येथे शिक्षा, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे बीज प्राप्त केले.
याद्वारे आदिवासी समाजातील नवीन पिढीला स्वावलंबी आणि सुसंघटित करण्याचे महत्वाचे कार्य अविरतपणे येथे सुरू आहे.
याकरिता समाजातील विविध प्रांतातील हजारो संवेदनशील आणि समर्पित दाते तन-मन-धनाने आपल्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी योगदान देत आहेत.