पारंपरिक ज्ञान, ग्रंथसंपदा आणि चिंतनात्मक साहित्य सृजन हा वारसा अव्याहत जतन करण्याची प्रेरणा देणाऱ्या पीठ कार्याच्या प्रेरणेने या ग्रंथालयास 'पूजनीय श्रीदेवनाथ' महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
येथे धामिर्क, अध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक विषयांवर आधारित जगभरात प्रकाशित होणाऱ्या पुस्तके, मासिके आणि जर्नल्सचा समावेश केलेला आहे.
येथे ५००० पुस्तकांचा संग्रह आहे, ज्यामध्ये काही दुर्मिळ हस्तलिखिते समाविष्ट आहेत.
नाथ परंपरेतील पूजनीय पिठाधीशांचे साहित्य, ग्रंथसंपदा, चरित्रे, इतिहास तसेच विविध कोशग्रंथ, धर्मग्रंथ आदींचे संकलन हे याचे प्रमुख वैशिष्ट्य होय.
भविष्यात या अमूल्य साहित्याचे लोकार्पण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती, विविध भाषांमध्ये त्यांचे प्रकाशन आणि प्रसार-प्रचार करण्याकरिता योजना संकंपित आहेत.