या उपक्रमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
गरजू रुग्णांना गंभीर वैद्यकीय सेवा आणि वाहतूक प्रदान करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि रुग्णांचे परिणाम सुधारणे हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असून यातील ही संस्था रुग्णसेवेसाठी खालील सुविधा आणि सेवा पुरवते.
वैद्यकीय उपकरणे: सीपॅप आणि बायपॅप मशीन (प्रत्येकी ५), ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (३२), रुग्णालयीन खाटा (५), व व्हीलचेअर्स (२०) हे सर्व निःशुल्क उपलब्ध आहेत.
रुग्णवाहिका सेवा: एक हृदयविकार रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सिलेंडरसह दोन सामान्य रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
वार्षिक रुग्ण सेवा शिबिरे: हृदय रोग निदान शिबिर, डोळे तपासणी व चष्मा वितरण शिबिर, तसेच रक्तदान शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते.
विशेष आदिवासी विद्यार्थी रोग निदान शिबिर: सिकेल सेल ऍनिमिया तपासणी तसेच आरोग्य तपासणी, आणि औषधी वितरण अशा सेवांचा समावेश आहे.
याद्वारे रूग्णांना रूग्णालयात नेण्यापूर्वी त्यांना स्थिर करण्यासाठी, अत्यावश्यक उपचारांसह, विविध वैद्यकीय सेवा प्रदान करतात.
याद्वारे दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसेवा पुरविल्या जातात.
याशिवाय प्रथमोपचाराविषयी समाजातील लोकांना प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाते.