विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची मांडणी करणे आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन जोपासणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय खेळ, स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण, पोलीस भरती प्रशिक्षण तसेच विविध भारतींसाठी प्रोत्साहन केले जाते.
शाळेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी भारतीय सैन्य दलात सेवेसाठी सहभागी होतात.
भारतीय परंपरा आणि समृद्ध वारसा यांचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचे संवर्धन करतानाच त्यांचे अंतिम यश साध्य करण्यास येथे प्राधान्य होय.
विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी, आकर्षक आणि संवादात्मक करण्यात आले आहे. या आधुनिक व्यवस्थेमुळे तज्ञ शिक्षकांचे ऑनलाइन वर्ग उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.
शाळेचे प्रमुख उद्दिष्ट हे सांप्रत मानवी आणि पर्यावरणाच्या समस्या यांविषयी विद्यार्थ्यांना अवगत करणे आणि त्यावरील उपाय योजनांकरिता त्यांना प्रेरित करणे हे होय.
भौतिक विकास, त्याची साधने व संधी याविषयी मार्गदर्शन करतानाच शांतता, सौहार्द, समानता या मानवी मूल्यांसह विद्यार्थ्यांना प्रगल्भ करणे.
प्रत्यक्ष ज्ञान, नवाचार, आधुनिक विज्ञान प्रदान करण्याकरिता विविध वैज्ञानिक प्रयोग आणि कार्यशाळा येथे आयोजित केल्या जातात, हे श्रीनाथ विद्यालयाचे वैशिष्ट्य होय.