ज्ञान हा जागतिक चैतन्य आणि शक्तीचा मूळ स्त्रोत आहे. वैदिक परंपरेने याचा विश्वाला प्रथम परिचय करून दिला. म्हणूनच वैदिक संस्कृतीला विश्वात पूर्वापार महतवाचे स्थान होय.
जगद्गुरू श्रीदेवनाथ वेद विद्यालय, ही वैदिक संस्था भारताचे पारंपरिक वैदिक ज्ञान समाजाभिमुख करण्याकरिता विशेषत्वाने प्रयत्नरत आहे.
आपली प्राचीन वेद परंपरा, विविध प्राचीन कला आणि शास्त्रे, धर्मग्रंथ, तत्वज्ञान आणि उपनिषदे, कर्मकांड इत्यादींचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट होय.
यादृष्टीने ऋग्वेदाच्या शाकल शाखेचे वेदविद्यालयाने दृकश्राव्य स्वरूपात संकलन केले आहे, जे IGNCA,संस्कृती मंत्रालय, भारत सरकार द्वारा वैदिक हेरिटेज पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पारंपरिक शास्त्रोक्त विधी विधानांचे महत्व आणि सविस्तर माहिती प्रसृत करण्याकरिता माहितीपर लेख येथे प्रसिद्ध केले जातात.
विविध वैदिक सूक्ते, स्तोत्रे तसेच शिक्षा, ज्योतिष, छंदशास्त्र, निघंटु, अष्टाध्यायी, अश्वलायन गृह्यसूत्र आदी विविध वैदिक ग्रंथ आणि गीता, सप्तशती, ज्ञानेश्वरी आदी विविध पारंपरिक ग्रंथांचे मौखिक संकलन युट्युब च्या माध्यमातून केले जाते.
याशिवाय अध्ययन, अध्यापन, यज्ञसत्र, वैदिक चर्चासत्र व संगोष्ठी यांचे आयोजन करून केवळ एकच नाही तर वेदांचा निस्पृहपणे प्रचार आणि प्रसार करणारे अनेक गट तयार करणे आणि राष्ट्रकल्याणाकरिता व्यक्तिनिर्माण कार्यात योगदान देण्याच्या कार्यात जगद्गुरू श्रीदेवनाथ वेद विद्यालय अग्रेसर आहे.