जगदगुरु श्रीदेवनाथ इन्स्टिटयूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च, नागपूर
ऋषी, मुनी, विद्वान, तत्त्वज्ञ यांच्या प्राचीन साहित्यामध्ये उपलब्ध मंत्र, श्लोक यांवर अनुसंधान करणे आणि संदर्भित शोध साहित्य निर्माण करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होय.
पारंपरिक वेद आदी ज्ञान आणि आधुनिक विविध शास्त्रशाखा यांचा वैज्ञानिक पद्धतीने समन्वय प्रस्थापित करण्यास येथे प्राधान्य दिले जाते.
याच्या प्रसार आणि प्रचाराकरिता विविध कार्यशाळा, संगोष्ठी, प्रदर्शनी याद्वारे आयोजित केल्या जातात.
सामाजिक दृष्टीने विशेषतः युवा वर्गामध्ये ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या विषयांवर वैज्ञानिक व कल्याणकारी चिंतन घडवून आणण्याचे प्रयत्न विविध उपक्रमांद्वारे सध्या केले जातात.
प्रचलित शैक्षणिक क्षेत्रात आवश्यक तेथे पारंपरिक शिक्षा साहित्य आणि मार्गदर्शन देणे आणि अशा धोरणांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य याद्वारे पार पाडले जाते.