शारीरिक शिक्षण आणि योग प्रशिक्षण यांद्वारे शारीरिक आणि मानसिक बलोपासना. हे या व्यायामशाळेचे प्रमुख वैशिष्ट्य होय.
जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराजांच्या बलोपासनेवरील प्रचंड आस्थेला अनुसरून हा उपक्रम प्रारंभ करण्यात आला.
ही शाळा व्यायामाच्या प्राचीन आणि आधुनिक प्रकारच्या विविध संसाधनांनी परिपूर्ण आहे.
राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे असते आणि म्हणूनच तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होय.
या व्यायामशाळेतील मुलांनी मल्लखांब तसेच अनेक इतर खेळांमध्ये राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय पदक प्राप्त केलेले आहेत.
या व्यायाम शाळे द्वारा तरुणांसाठी व्यक्तिगत आरोग्यासह सामूहिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आधारित अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवणे आणि नवीन युगातील आव्हाने पेलण्यास सक्षम पिढीची निर्मिती करण्यात या शाळेचा मोलाचा वाटा आहे.