ही संस्था संगीत विद्यालयासह भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करते.
श्रीनाथ गांधार संगीत विद्यालय हा सद्धर्म प्रवर्तन मंडळ या संस्थेच्या अतंर्गत चालणारा सेवाभावी उपक्रम असून प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनात सुरू असलेले हे सांगीतिक कार्य आहे.
या केंद्राची स्थापना २५ मार्च २०२०, गुढी पाडवाच्या शुभ पर्वावर झाली असून केंद्र प्रमुख सौ पल्लवी पद्माकर भिरंगी या आहेत.
श्रीनाथ गांधार संगीत विद्यालय हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अधिकृत परीक्षा केंद्र असून या ठिकाणी दरवर्षी शेकडो विद्यार्थी शास्त्रीय संगीताच्या प्रारंभिक (पहिली परीक्षा) ते मध्यमा पूर्ण (पाचवी परीक्षा) पर्यंतचे शिक्षण घेतात.
संगीत शिक्षक, विद्यार्थी आणि संगीतप्रेमींपर्यंत पारंपरिक शास्त्रीय संगीताचे महत्व प्रस्थापित करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्तिपरंपरेतील त्याचे महत्व याचा प्रसार, प्रचार आणि जागरूकता समाजात स्थापित करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होय.
श्रीनाथ विद्यालयातील वन बंधू विद्यार्थ्यांना सुद्धा शास्त्रीय संगीताचे मोफत शिक्षण व मार्गदर्शन हा संगीत विद्यालय द्वारे देण्यात येते.
या गायन शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेत पारितोषिका सह यश संपादन केले आहे.
या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय शिक्षा निती २०२० च्या अंतर्गत संगीत विषयक लघु संशोधन केले असून भारतीय ज्ञान परंपरा (IKS) २०२१-२२ साठी संगीत या विषयात प्रबंध लेखनाचे कार्य सुद्धा केले आहे.
भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित विद्वान आणि सुप्रसिद्ध कलाकारांनी येथे भेट दिलेली आहे.