महाराजांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी इ.स.१६५२ मध्ये माता-पिता इहलोक सोडून गेले. पुढे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनीच यांचा सांभाळ केल्याचे सांगितले जाते. दत्तराज स्वामी अनाथ कैवारी । मानुजरुपें येऊनि बाळा सांभाळी । भिक्षेची दीक्षा दे लडिवाळी । वाढावी प्रतिपाळी विश्वंभरा ।। (श्री दे.ली.,तरंग ५)
श्री दत्तात्रेयांनीच यांचे व्रतबंध आदी संस्कार पार पाडले आणि यांना श्री कृष्णानंदनाथांच्या चरणी अर्पण केले.
पुढे संपूर्ण भारतवर्षात महाराजांनी धर्मध्वजा आणि भक्तिध्वजा यांचा प्रसार केला.
धर्मोद्धारासाठी अखंड भजन, तप, तीर्थाटणें, पर्यटने यांमध्ये श्रीनाथ परंपरेमध्ये यांचे फार मोठे योगदान होय.
इ.स.१७१० मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी काशी येथे महाराजांनी समाधी घेतली.
श्रीकृष्णानंदनाथाचे वरदानी । संपली स्थिती वेगळेपणी ।
गुरु शिष्य मिरविती एकपणी । विश्वनाथ त्रिभुवनी गाजला ।।