श्री रंगनाथ महाराज हे समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांच्या समकालीन संत आहेत ज्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला.
पुर्वाश्रमी रंगोपंत या नामाभिधानाने हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात शिलेदार होते तसेच समर्थ रामदास सवामी नित्य त्यांना आपल्याजवळ बसवीत. यांची सद्गुरू मुऱ्हारनाथांची प्रथम भेट ही रायगड येथे झाली.
पुढे सद्गुरूंनी महाराजांचा योगपट्टाभिषेक केला आणि हे पुढील पीठाधीश झाले.
एका प्रसंगात भिक्षाधर्माची महती आणि दत्ताज्ञेचे स्मरण करून महाराजांनी राजसन्मानात प्राप्त झालेली जहागिरी विनम्रपणे नाकारली. याद्वारे परंपरागत प्रासादिक झोळी ही कृपाप्रसादाची कामधेनू असल्याचा बोध सर्वांना करून दिला.
इ.स.१७२४ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी यांनी शिऊर बारापाडाच्या जंगलात बाभुळगाव येथे समाधी घेतली, जेथे पुढे श्री गोपाळनाथांनी समाधी स्थान स्थापन केले.
असे सांगण्यात येते की, श्री रंगनाथ महाराज हे नवनाथांमधील मच्छिन्द्रनाथ महाराज आणि श्री गोपाळनाथ महाराज हे श्री गोरक्षनाथांचा अवतार आहेत.
सहज समागम हो प्रेमाचा । काही काळ जय परिचयाचा । पाहोनि पूर्ण अधिकार पंतांचा । बोध महावाक्याचा घडे ।।