तेरावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री रामकृष्णनाथ महाराज
(१८१७ - १८९१)
यांचे प्राकट्य इ.स. १८२२ मध्ये नागपूर येथील अंधारे घराण्यात झाले.
यांची आजी श्री देवनाथांची उपदिष्ट शिष्या होती. यांचे घराण्यात चतुर्थ पिढीत श्रीदेवनाथ महाराज पुन्हा अवतरित होऊन उर्वरित कार्य करतील, असा संकेत श्री दयाळनाथ महाराजांनी त्यांना दिला होता.
श्री देवनाथ महाराजांनी निजधामास जाण्यापूर्वी स्वमुखातील हनुमंत मूर्ती काशीस्थित मारुतीबुवा नामक संतांना दिली होती. ती सद्गुरू आज्ञेनुसार यांनी परत आणली.
इ.स. १८५१ मध्ये श्रीमहाराजांचा ग्वाल्हेर येथे पट्टाभिषेक सोहळा पार पडला. पुढे चाळीस वर्षांच्या बृहद् कारकिर्दीत यांनी पीठकार्याचा विस्तार भारतवर्षात केला.
काही काळ यांचे वास्तव्य शिरसगाव येथे होते. पुढे तेथील मठव्यवस्था लावून ते पुनः वास्तव्यास श्रीदेवनाथ मठ,अंजनीग्राम येथे आले.
सांप्रदायिक महावैष्णव दृष्टी, भस्मोद्धूलित अंगकांती, वैराग्याची परमज्योती स्वरूप श्रीमहाराजांमध्ये दर्शनार्थींना प्रत्यक्ष श्रीदत्तयतींचेच दर्शन होत असे.
शके सतराशे चौरेचाळीस चैत्र कृष्ण अष्टमीस यांनी समाधी घेतली.