तिसरे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री नित्यानंदनाथ महाराज
(१५८२ - १६६१)
श्री नित्यानंदनाथ महाराज मूळचे काशीचे यांचा निवास पैठण जवळील कावसान येथे झाला.
महाराज हे बालपणापासूनच श्री एकनाथ महाराजांच्या सहवात राहिले. यांना गावबा या नावाने देखील संबोधित केले जात असे. परंतु आचार्य पट्टाभिषेक दीक्षेनंन्तर त्यांचे नाव नित्यानंदनाथ झाले.
महाराजांनी श्री एकनाथांचे भावार्थ रामायण पूर्ण केले. याशिवाय कीर्तन, प्रवचन, भिक्षाटन आणि समाज प्रबोधन यामध्ये ते व्यस्त असत.
श्री नाथ परंपरेचे पारमार्थिक, विवेकयुक्त वैराग्य आणि तेजस्वी धर्मरक्षणाचे स्वरूप यांनी यांच्या कारकिर्दीत प्रकाशमान केले.
सद्गुरूंविषयी दृढ श्रद्धाभाव आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे कार्यरक्षण करण्याचा बोध त्यांनी दिला.
इ.स १६६१ रोजी कावसान येथे त्यांनी समाधी घेतली परंतु पैठण येथेच त्यांची समाधी आहे.