सहावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री मुऱ्हारनाथ महाराज
(१६५५ - १७२०)
महाराज आणि त्यांचे सद्गुरू श्री विश्वनाथ महाराज यांची प्रथम भेट श्रीरंगपट्टणम येथे झाली. येथेच त्यांना साक्षात्कार झाला. शंकर - पार्वती, गणपती, शक्ती, नंदी यांच्यासह शिवपंचायतनाचे दर्शन घडले आणि पुढील कार्याची दिशा मिळाली. सद्गुरूने अंगिकारता । अनन्य शरण जाता ।। समाधान सर्वथा । मन बुद्धीसी घडे आकलनता ।। ध्येय ध्याता ध्यान । एकची जाहले ।। सुंदर हरिरूप चोहीकडे । सर्वाभूती भगवत्दर्शन घडले ।।
महाराजांना सद्गुरूंनी केलेला उपदेश श्री देवनाथ लीलालहरी ग्रंथात असा दिलेला आहे, नेमस्त आचाराविचाराविना । न सरे विषयी विवंचना ।। न घडता मन बुद्धीचे समर्पण । न साधे कोणा परमार्थ ।। म्हणुनी प्रपंच परमार्थ भेद विसरी । अभिलाषा कशाचीही न धरी ।। सद्गुरू अंतर्यामी नित्य स्मरी । अनिष्ट निवारी हरिनाम ।।
पुढे सद्गुरुंच्या सहवासात त्यांनी पर्यटन करता करता जगदोद्धाराचे कार्य केले.
इ.स. १७२० मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे समाधी घेतली.
एकाच वेळी काशी व चंद्रपूर येथील भक्तांसमोर समाधी सोहळा केला त्यामुळे काशी येथेही समाधी आहे.