मायबाई
ब्रह्मलीन श्रीनाथशक्ति श्रीस्वरुपा
उज्ज्वला माता गुरुमनोहरनाथ
यांचे प्राकट्य इ.स. १९३३ साली कुष्मांड नवमीला नागपूरस्थित दिवाण कुटुंबात झाले.
वयाच्या दहाव्या वर्षी व्रतबंध संस्कार झाल्यावर यांची सद्गुरू श्रीगोविंदनाथ महाराजांची प्रथम भेट झाली. यांचे मूळ नाव विनायक होते परंतु यांची सुगंधित सुवर्णकांती, विशाल मस्तक, नेत्रांत अभिनव शांती, मधुर वाणी आणि हनुमंताप्रमाणे तेजस्वी रूप पाहता यांना मनोहर असे नामाभिधान प्राप्त झाले.
पुढे तपोसाधनेत निमग्न असता यांना समाधी अवस्थेत मागील चार पीठाधीशांचे आणि यांसह स्वतःचे भावी स्वरूपाचे दर्शन आणि दृष्टान्त झाला. तसेच प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेने पुढील कार्यदिशा प्राप्त झाली.
इ.स. १९६० रोजी वैशाख शुद्ध दशमीला यांचा योगपट्टाभिषेक सोहळा पार पडला.
श्रीमहाराजांचे विपुल ग्रंथ भांडार आजही उपलब्ध आहे ज्यामध्ये नाथ साधकांना उपदेशित सन्मार्ग शतपाऊली, श्रीदेवनाथांचे चरित्रपर ग्रंथ नाथ फकीर व पारायण ग्रंथ श्रीदेवनाथ लीलालहरी, विविध आख्यान, आरत्या, पदे, उपासनापर स्तोत्रे आदींचा समावेश होतो.
श्रीमहाराजांनी श्रीनाथ सखा साधक वृंद हे सांप्रदायिक संघटन निर्माण केले ज्याच्या विविध शाखा भारतात आजही कार्यरत आहेत. सांप्रदायिक नित्यनैमित्तिक प्रार्थना, साप्ताहिक उपासना, हिवाळी व उन्हाळी शिबीर, वार्षिकोत्सव आदींचा परिपाठ घालून दिला.
ज्याप्रमाणे श्रीदेवनाथ महाराजांचा पेशव्यांच्या दरबारात सन्मान करण्यात आला होता तसाच इ.स.२००० मध्ये यांचाही सन्मान करण्यात आला.
इ.स.२००० मध्ये यांनी श्रीदेवनाथ मठात समाधी घेतली.