चौथे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री कृष्णानंदनाथ महाराज
(१६२९ - १६८२)
महाराजांचे प्राकट्य शके १५५० मध्ये खानदेश, महाराष्ट्रातील 'सावदे' या गावात झाले.
महाराजांच्या मातापित्यांनी भगवान दत्तात्रेयाची भक्तिभावाने उपासना केली, त्यावेळी भगवान दत्तात्रेयांनी यांना आम्रफल प्रसादात दिले व तुमचे पोटी श्रीनारायणाचा अवतार होईल असा वर दिला
उदरी येईल वैकुंठरमण । भूवरी करील धर्मोद्धारण ।।
इ.स.१६५४ रोजी दत्तप्रभूंच्या आज्ञेने कीर्तनकारांच्या वेशात नारदांचे त्यांना दर्शन झाले, त्यांनी श्रीकृष्णानंदांना त्यांच्या पुढील कार्याचे स्मरण करून दिले व कार्यदिशा दाखविली.
गुरुभक्तीतून परमार्थाची खाण दाखवीत समाजाला सन्मार्गी लावण्याचा महत्वाचा कार्यबोध त्यांनी केला.
इ.स.१६८२ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी समाधी घेऊन आपले अवतारकार्य पूर्ण केले.