बारावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री जयकृष्णनाथ महाराज
(१७९० - १८५१)
यांचे प्राकट्य वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील आष्टी येथे देशपांडे यांचे घराण्यात झाले.
बालपणीच सद्गुरू देवनाथ महाराजांनी घेतलेल्या कसोटीत आपले गुरु श्री दयाळनाथ महाराजांकरिता प्राणार्पण करण्याची तयारी दर्शविली आणि सद्गुरुनिष्ठेचा परिचय करून दिला.
यांचा पट्टाभिषेक नागपूर जवळील पवनी येथे गाडे यांच्या द्वारा वैनगंगेच्या तीरावर संपन्न झाला.
आपल्या सद्गुरूंप्रमाणेच यांच्या रसाळ वाणीतील कीर्तनाने सर्व ईश्वरभावात तल्लीन होत. हे भगवान परशुरामाचे अंशावतार होते.
यांनी अन्नपाणी वर्ज्य करून अतिशय कडक अशी भगवान दत्तात्रेयांची तपश्चर्या केली.
भगवान दत्तात्रेयांनी यांना दर्शन देऊन वरदान दिले तसेच परंपरागत प्रासादिक कंठा, छडी आणि एकमुखी रुद्राक्ष यांचा स्पर्श करून जीर्णोद्धार केला.
एका प्रसंगात निजाम आणि दिवाण यांनी देऊ केलेली जहागिरी सादर नाकारून यांनी नाथ परंपरेच्या कामधेनू स्वरूपी प्रासादिक झोळीचे महत्व सिद्ध केले.
इ.स. १८५१ मध्ये यांनी श्रीदेवनाथ मठ स्थानी समाधी घेतली.