सोळावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री गोविंदनाथ महाराज
(द्वितीय) (१८९४ - १९६०)
सोळावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री गोविंदनाथ महाराज
(द्वितीय) (१८९४ - १९६०)
मायबाई
ब्रह्मलीन श्रीनाथशक्ति श्रीस्वरुपा
सत्यभामा माता गुरुगोविंदनाथ
यांचे प्राकट्य इ.स. १८९४ रोजी भाद्रपद वद्य प्रतिपदेस उमरेड येथे भाके घराण्यात झाले. यांचे वडील श्रीमारोतीनाथ महाराजांचे बालमित्र आणि श्रीभालचंद्रनाथ महाराजांचे अनुग्रहित होते. “भाक्यांचा पुत्र नामे गोविंद । तयासी भालचंद्र अंकी बसवीत । म्हणती आजेगुरु श्रीजयकृष्णनाथ । पुनश्च अवतरत पीठकार्या ।।” (श्री दे.ली. ३३.२)
यानुसार श्रीगोविंदनाथांच्या स्वरूपात श्रीजयकृष्णनाथ पुनः भूतलावर अवतरित झाले.
यांचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहकार चळवळ, स्वदेशी आंदोलन इ. मध्ये सक्रिय सहभाग होता. राष्ट्रीय चळवळीत त्यांना 'गुरुजी' हे नामाभिधान दिले गेले.
राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक आदी विविध क्षेत्रात यांचा विशेष प्रभाव होता.
याशिवाय मठातील कुलाचार, विविध उत्सव, पूजाअर्चा, भजन, कीर्तन, भिक्षा महोत्सव आदी विविध व्यवस्थांचे शिस्तबद्ध आणि सकुशल संचलनाचा आदर्श गोविंदनाथांनी निर्माण केला.
श्रीमहाराजांनी भगवान श्रीमाधव - मंजिरी यांच्या विग्रहाची स्थापना श्रीदेवनाथ मठात केली.
इ.स. १९६० मध्ये त्यांनी श्रीदेवनाथ मठात समाधी घेतली.