यांचे प्राकट्य संत मोरया गोसावी यांच्या कुळात चिंचवडकर देव यांच्या वंशात महाराष्ट्रातील चिंचवड, पुणे येथे झाला.
यांची सद्गुरू श्री गोपाळनाथ यांची प्रथम भेट कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात झाली. येथे ते भगवान दत्तत्रेयंच्या आज्ञेने व श्री गोपाळनाथ हे श्री रंगनाथांच्या आज्ञेने आले होते. गोपाळा स्मरे रंगनाथ वचन ।चिंचवडी गोविंद देव कुलोत्पन्न । भावी पुरुष परंपरे भूषण । गोविंदा महान वैष्णव तो ।। (श्री दे.ली., तरंग ६)
पुढे त्रिपुटी येथे सद्गुरूंनी त्यांचा योगपट्टाभिषेक सोहळा संपन्न केला.
यांनी देव, देश आणि धर्माच्या प्रचारार्थ संपूर्ण भारतभर भ्रमण केले. असेच यात्रेत असताना त्यांना भगवान दत्तात्रेयांची पुढील पिठाधीशाच्या संकेताची आज्ञा झाली, दत्त सांगती श्रीनाथयासी । प्रत्यक्ष हनुमंत जन्मले भूलोकासी । राजेश्वराचे द्वितीय पुत्र रूपेसी । पुढती परंपरा वारसा ।।
यानुसार पुढे त्यांनी श्री देवनाथ महाराजांना पट्टाभिषिक्त केले.
यांच्यी स्वानंदी, निजानंदी आदी विविध ग्रंथरचना तसेच विठ्ठल विजय हा महाग्रंथ आजही उपलब्ध आहे.
इ.स.१८१२ रोजी श्री क्षेत्र बऱ्हाणपूर येथे यांनी समाधी घेतली.