श्री एकनाथ महाराज यांचे प्राकट्य पैठण, महाराष्ट्र येथे शके १४५५ (इ.स. १५३३) रोजी झाले.
महाराजांचे संपूर्ण कुळ निरंतर पांडुरंगाच्या भक्तीसेवेमध्ये समर्पित होते.
शके १४७५ (इ.स. १५५३) ला सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपेने यांना भगवान दत्तात्रेयाचे दर्शन आणि गुरु-अनुग्रह प्राप्त झाला.
चतुःश्लोकी भागवतावर व एकादश अध्ययावर श्रीएकनाथी भागवत ही नाथांची प्रथम ग्रंथरचना होय. याशिवाय चिरंजीवी पर्व, भावार्थ रामायण, विविध अभंग, पदे, गवळणी, भारूड, स्तोत्रे आदी विपुल प्रमाणात साहित्य संपदा उपलब्ध आहे.
संत श्री एकनाथ महाराजांनी संपूर्ण भारतवर्षात भगवान दत्तात्रय प्रणीत नाथ परंपरा आणि भक्तीचा प्रसार-प्रचार केला.
फाल्गुन वद्य षष्ठीला (इ.स. १६००) ला यांनी समाधी घेतली.