यांचे प्राकट्य अंजनीग्राम येथे देशपांडे (कमाविसदार) घराण्यात झाले.
हे प्रत्यक्ष भगवान हनुमंताचे अवतार असून चपळता, प्रचंड बुद्धिमत्ता, बलवान शरीरयष्टी, स्वभावातील धीरगंभीरता आदी विविध दैवी गुणांचा वास यांच्यामध्ये होता. यांची तपस्या भैरवनाथ शरनीरा (शहानूर) नदीच्या काठी अंजनगांव येथे झाली व हनुमंत दर्शन ‘वारी’ (अकोट जवळ) येथे झाले.
प्रारब्ध वश अल्प गृहस्थाश्रम होताच यांनी हनुमंताचे तपानुष्ठान केले. भगवान हनुमंताने यांना स्वतः तसेच जानकीसहित भगवान रामचंद्रांचे साक्षात दर्शन दिले.
प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जिव्हेवर 'श्रीराम' हि अक्षरे कोरून त्यांना शीघ्र कवित्व आणि अखंड विद्यास्फुरणाचे वरदान दिले.
यानंतर सद्गुरू गोविंदनाथ यांचे त्यांना दर्शन झाले आणि काही वर्षांनी इ.स. १७७९ ला जालना येथे आनंदीस्वामींच्या मठात यांचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला.
यानंतर सद्गुरू गोविंदनाथ यांचे त्यांना दर्शन झाले आणि काही वर्षांनी इ.स. १७७९ ला जालना येथे आनंदीस्वामींच्या मठात यांचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला.
पुढे स्वतःच्या तपोष्ठानाने यांनी अंजनीग्राम येथे श्रीनाथ पीठ स्थिर केले, जे स्थान श्रीदेवनाथ मठ म्हणून पुढे विख्यात झाले.
यांची साहित्य संपदा समृद्ध असून यामध्ये अनेक पदे, आख्यान, आरत्या, स्तोत्रे दिसून येतात.
हे परम योगी होते. इ.स. १८२१ मध्ये ग्वालेर येथील सिंधीया महालासमोर फुलबाग येथे योगाग्नी समाधी घेतली. पुढे प. पू. दयाळनाथ महाराजांनी यांचे कार्याचा विस्तार केला.