यांचे प्राकट्य मूर्तिजापूर, जिल्हा -अमरावती येथे वैकुंठ चतुर्दशीला देशमुख घराण्यात झाले. यांचे स्वरूपात साक्षात भगवान विष्णू धर्मोद्धाराकरिता भूतलावर अवतरीत झाले. यांचे प्रकट स्थान स्मारक मूर्तिजापूर येथे विठ्ठल मंदिरात आहे.
व्रतबंध झाल्यावर भगवान दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार यांनी श्रीक्षेत्र माहूर बद्रिकावनात तपोसाधना केली. हे श्रीनारायणाचे अवतार होते.
स्वभावातील मार्दवता, सहजता आणि दयाळू स्वभाव असल्याने यांचे आजेगुरू यांना (श्रीहरी) 'दयाळ' अशी हाक मारत, पुढे याच दयाळनाथ नावाने ते विख्यात झाले.
यांची कीर्तने म्हणजे वेदान्त, भक्ती आणि मोक्षप्राप्तीची पर्वणीच असे. यांचेसुद्धा विपुल साहित्य भंडार उपलब्ध आहे.
अखंड सद्गुरुसेवा आणि लोकोद्धाराचे व्रत, पराकोटीची सद्गुरूनिष्ठा, सर्वांशी प्रेमळ व्यवहार आणि जीवनात ईश्वर तादात्म्यप्राप्ती आदी अनेक आदर्श यांचे जीवनचरित्रात दिसून येतात.
पुढे हैद्राबाद येथे ही समाधी निजामाच्या महाला शेजारी (हायकोर्टाचे बाजूला) नदीकडून हनुमंत मंदिरात आज ही आहे.