अठरावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज
(सन १९६८ पासून पुढे)
अठरावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज
(सन १९६८ पासून पुढे)
मायबाई
विद्यमान श्रीनाथशक्ति श्रीस्वरुपा
रेणुका माता गुरुजितेंद्रनाथ
यांचे प्राकट्य इ.स. १९६८ मध्ये अमरावती येथे लोमटे घराण्यात वामन द्वादशीला झाले.
मातापिता ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण करीत तसेच यांचेकडे नित्य माऊलीचा समाधी संजीवन सोहळा आजही होतो. या उत्सवास व अखंड ज्ञानेश्वरीच्या अध्यासनास चौदा वर्ष झाल्यावर भगवान विष्णुरूपी वामनानेच जणू यांचे पोटी अवतार घेतला.
शैक्षणिक दृष्ट्या बी एस्. सी, एम् फार्म, एम्. लिब त्यांनी सुवर्णपदकासह उत्तीर्ण केले. पुढे ते सर सी.व्ही.रमण पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले.
सामाजिकदृष्ट्या ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
रिद्धपूर येथे श्रीगुरुचरित्राचे पारायण करीत असता त्यांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी दर्शन दिले आणि पुढील कार्यदिशा प्राप्त झाली.
इ.स. २००१ मध्ये जितेंद्रनाथांचा योगपट्टाभिषेक सोहळा पार पडला.
आजपर्यंत श्रीनाथ परंपरेशी संबंधित अनेक मठ ,मंदिरांचा आणि श्रीनाथांच्या लीला स्थानांचा जीर्णोद्धार, उपासना सत्रे, पारंपरिक कुलाचार, ग्रामोत्सव यांना व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले आणि देश-विदेशात श्रीनाथ सखा साधक वृंदाच्या शाखा स्थापन केल्या.
धार्मिक क्षेत्रात कार्य करताना यांनी इ.स.२०१२ आणि २०१६ दरम्यान विराट धर्म संस्कृती महाकुंभाचे यशस्वी आयोजन केले, ज्यामध्ये भारतवर्षातील अग्रगण्य संत, सत्पुरुषांचे आगमन आणि विराट धर्मसंसद पार पडली. याशिवाय संत तुकाराम गाथा, श्रीज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत यांची नित्य सामूहिक पारायणे व अविरत प्रवचनसेवा दरवर्षी मठात होते.
सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राद्वारे समाज जागृती करण्याकरिता यांनी शालेय मुलामुलींकरिता श्रीनाथ विद्यालय, श्रीनाथ गांधार विद्यालय, जनजाती वनवासी परिवारांकरिता श्रीनाथ छात्रावास, वैदिक ज्ञानाच्या प्रसार-प्रचारार्थ जगद्गुरू श्रीदेवनाथ वेदविद्यालय, जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान केंद्र, बलोपासनेला प्राधान्य देत श्रीदेवनाथ व्यायामशाळा, माता, बालिका व महिलांच्या एकत्रित संगठनाकरिता विश्वमांगल्य सभा या वैश्विक महिला जनसंघटनेची स्थापना केली ज्यांचा कार्यविस्तार आज भारतवर्षासह विश्वातील पंधरा प्रमुख देशांमध्ये व्याप्त झालेला दिसून येतो.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये 'श्री श्री आचार्य १००८' तसेच पैठण येथे 'श्री भानुदास एकनाथ पुरस्कार' आदी अनेक प्रमुख सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
देव, देश आणि धर्म याकरिता समर्पित जीवन आणि प्रखर धर्मनिष्ठा व राष्ट्रभक्तीचे आदर्श म्हणून यांचे कार्य श्रीनाथ परंपरेस सुवर्णमुकुटसदृश आपल्या देदीप्यमान तेजाने अलंकृत करते.